कोरेगाव बुद्रूक सोसायटी अध्यक्षपदी रोहित डावरे पाटील

कोरेगाव बुद्रूक सोसायटी अध्यक्षपदी रोहित डावरे पाटील

Published on

पाईट, ता. ३ : कोरेगाव बुद्रूक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रोहित डावरे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुरेखा डावरे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभेचे आयोजन केले होते. यावेळी श्रीकांत डावरे पाटील, तुकाराम गोगावले, गणेश गोगावले, महेंद्र डावरे पाटील, मनोहर कल्हाटकर, संजय गोगावले, शिवाजी लवंगे, दादा कल्हाटकर, नानासाहेब लोंढे, जनताबाई डावरे पाटील, संदीप डावरे, प्रवीण लगाडे, दत्तात्रेय डावरे पाटील, संतोष कड, संदीप डावरे पाटील, शिवाजी डावरे पाटील, विक्रम डावरे, यशवंत डावरे पाटील, किरण डावरे पाटील, तानाजी गोगावले, संतोष गोगावले, विश्वास डावरे पाटील, जनार्दन डावरे पाटील, संतोष कल्हाटकर आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील व आंबेठाण माजी सरपंच दत्ता मांडेकर यांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत व सोसायटी सचिव माणिक डांगले यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com