पुणे
पाईट येथील शिबिराचा २३४ जणांनी घेतला लाभ
पाईट, ता. ५ : महसूल सप्ताहांतर्गत पाईट (ता. खेड) येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिराचा २३४ जणांना लाभ झाला. या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार मनिषा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडलाधिकारी मनीषा सुतार, प्रतिभा कसबे, संजय वाघमारे, अनिल जगताप, ग्रामअधिकारी अनिल फुलपगार, मधुकर ढवणे, अशोक जंगले, देविदास विश्वास, दीपक तळपे, अमोल भालेराव, अनिकेत तिटकारे आदी उपस्थित होते.
शासकीय कागदपत्रे
ठाकर समाज जातींचे दाखले अहवाल - ६२, तलाठी उत्पन्न दाखले - ७७, ७/१२ व ८अ - ६७, अल्पभूधारक दाखला अहवाल - १, तलाठी उत्पन्न दाखले - ७७, जन्माचे दाखले - २, मृत्यू दाखले - ४, ई पीक पाहणी - ७ खातेदारांना ॲप डाऊनलोड करून माहिती दिली. संजय गांधी/ श्रावण बाळ योजना डीबीटी - १४.