बड्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट अन् तातडीने जामीन
पाईट, ता. १७ : चाकण (ता. खेड) येथे पुणे-नाशिक महामार्गावर चाकण -तळेगाव चौकात सन २०१७ मध्ये बैलगाडा शर्यत बंदीविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना तारखेला हजर न राहिल्याने खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. सी. गुप्ता यांनी गुरुवारी (दि.१४ ) अटक वॉरंट काढले. या अटक वॉरंटच्या आदेशानंतर बड्या राजकीय नेत्यांना अटक होणार की काय याबाबत काहीकाळ मोठी राजकीय खळबळ उडाली होती; मात्र राजकीय नेत्यांच्या वकिलांनी तातडीने प्रयत्न करून जामीन मिळवला आणि या घटनेवर पडदा पडून चर्चा थांबल्या. दरम्यान, नेत्यांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
अटक वॉरंट जारी करण्यात आलेल्यांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी मंत्री संजय बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, माजी आमदार दिलीप मोहिते, दिगंबर भेगडे, देवराम लांडे यांच्यासह इतर ३१ जणांचा यात समावेश आहे. या सर्वांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, २०१७ मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी सुरू होती. मात्र, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी चाकण येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. हा रस्ता बंद करून या ठिकाणी सभा घेण्यात आली होती. निषेध सभा घेतल्याने रस्त्याला व वाहतुकीला अडथळे झाल्याच्या कारणावरून अनेक नेत्यांवर व कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यानंतर हा खटला राजगुरुनगर येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. सुरवातीला तारखेला सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ते हजर राहत होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आणि राज्य सरकारने बैलगाडा शर्यत आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे सरार्स मागे घेण्यात येतील, अशी घोषणा केल्याने या खटल्यामधील बहुसंख्य नेत्यांनी या सुनावणीच्या तारखांकडे दुर्लक्ष करून न्यायालयात हजर राहणे टाळले; मात्र अटक वॉरंट निघताच सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करून खेड न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.