

पाईट, ता. ९ : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी दिगंबर ऊर्फ दिग्या विठ्ठल कदम (रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी) याला खेड न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.खेड न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. उतकर यांनी हा निकाल दिला. १ जानेवारी २०२५ला रात्री आळंदी नगरपरिषद वाहनतळाजवळ पोलिसांनी दिगंबरला अटक केली होती. पोलिस शिपाई रामदास मरगळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती, तर पोलिस उपनिरीक्षक आर. जी. दुधमल यांनी तपास केला होता. सरकारी वकील अर्चना चव्हाण यांनी या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला आर्म ऍक्टनुसार दोषी ठरवले. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल. या प्रकरणात पोलिस हवालदार राहुल मोहिते यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.