पाईटमध्ये गॅस पुरवठा विस्कळित

पाईटमध्ये गॅस पुरवठा विस्कळित
Published on

पाईट, ता. ११ : येथील श्रीराम गॅस एजन्सीकडून होणारा अनियमित पुरवठा आणि सेवेतील त्रुटींबाबत संतप्त ग्रामस्थांनी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना शुक्रवारी (ता. १०) निवेदन दिले. संबंधित एजन्सीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागातील सुमारे ३९०० ग्राहक या एजन्सीवर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांपासून वेळेवर गॅस मिळत नसल्याने तीन ते ३५ किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या ग्राहकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि संभाव्य गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर व गॅसधारकांनी निवेदनातून तक्रारी मांडल्या आहेत. शासनाने तातडीने पर्यायी गॅस पुरवठा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी किंवा नवीन वितरकाची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रमुख तक्रारी
एजन्सीचे कार्यालय बहुतांश वेळा बंद आढळत असल्याने पश्चिम भागातील ग्राहकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागतात
अनेक ग्राहकांची के. वाय. सी. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध होत नाही
गॅस वितरणाच्या तारखा, गॅसची गाडी येण्याची वेळ याबाबत ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. तसेच बऱ्याचदा संपर्क क्रमांकावर प्रतिसाद मिळत नाही
ग्राहकांकडून गॅस सिलिंडरचा पूर्ण मोबदला व टाकी आगाऊ स्वरूपात जमा करून घेतली जाते; मात्र वेळेत गॅसपुरवठा होत नाही
एजन्सीकडे प्राप्त होणाऱ्या सिलिंडरचा व प्रत्यक्ष वितरणाचा कोणताही पारदर्शक हिशेब ठेवला जात नाही .त्यामुळे गॅसचा काळाबाजार होत असल्याचा दाट संशय ग्राहकांनी निवेदनात व्यक्त केला आहे
एजन्सीच्या कुटुंबातील व्यक्तींकडून गॅसग्राहकांना उद्धट व दमदाटीची भाषा वापरली जाते
एजन्सी ऑफिसमध्ये ग्राहकांना तक्रार करण्यासाठी तक्रारपुस्तिका उपलब्ध नाही
ग्राहकांना घरपोच सिलिंडर उपलब्ध करून दिले जात नाही
अनेक वर्षांपासून एजन्सीकडे अधिकृत कर्मचारी नियुक्त नसल्याने ग्राहक सेवा ठप्प होत असून वितरणाचे विस्कळित झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com