आदिवासी विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण द्या ः चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण द्या ः चव्हाण
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण द्या ः चव्हाण

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण द्या ः चव्हाण

sakal_logo
By

फुलवडे, ता. १३ ः ‘‘आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, हे एक आव्हान असून आदिवासी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतून गुणात्मक शिक्षण देणे व ते टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण विभाग) विठ्ठल चव्हाण यांनी केले.

तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते. घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन प्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद, तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन विठ्ठल चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुरगुडे, मुख्याध्यापक बाळासाहेब दरेकर यांच्या हस्ते झाले.

घोडेगाव केंद्रातील शासकीय आश्रमशाळा घोडेगाव, गोहे, राजपूर, तेरुंगण, आहुपे, असाणे व अनुदानित आश्रमशाळा फुलवडे येथील इयत्ता ५ ते ७ वर्गाला अध्यापन करणारे सर्व शिक्षक या शिक्षण परिषदेत सहभागी झाले होते.

याप्रसंगी शिक्षकांना विषयमित्र भागवत भंगे व सिद्धेश्वर हात्तरगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन वाघमारे यांनी, तर आभार लक्ष्मण देवकर यांनी मानले.
---------------------
आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेतील शिक्षकांच्या अधिक चांगल्या कामगिरीकरिता पायाभूत शिक्षण पद्धतीत बदल करून विविध शैक्षणिक मुद्यांवरील चर्चा व त्यावर आधारित उपक्रमनिर्मिती, तसेच विविध विषयांवरील संकल्पना व संबोध सुलभ पद्धतीने समजण्यासाठी आयुक्तालय व प्रकल्प कार्यालयस्तरावर स्वतंत्र शैक्षणिक गुणवत्ता कक्ष स्थापना करण्यात आला असून, त्यानुसार केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. - बळवंत गायकवाड, प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव
----------------------
तेरुंगण (ता. आंबेगाव) ः येथील शासकीय आश्रमशाळेत उपस्थित अधिकारी व शिक्षक.


-------------------