असाणे येथे सरळसेवा सराव परीक्षेचे आयोजन

असाणे येथे सरळसेवा सराव परीक्षेचे आयोजन

फुलवडे, ता. ४ : असाणे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी क्रांती संघटनेने आगामी सरळसेवा आणि पोलिस भरतीच्या धर्तीवर सराव लेखी परीक्षेचे १४ एप्रिल रोजी आयोजन केले असून सदर परीक्षेचा निकाल १९ एप्रिल रोजी तर बक्षीस वितरण २१ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सागर ठुबल यांनी दिली.

या परीक्षेसाठी पाचवी ते नववी (लहान गट) व दहावी ते पदवीधर (मोठा गट) असे दोन गट केले आहेत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मराठी, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, पंचायत राज आदी घटकांवर आधारित आहे. ही प्रश्नपत्रिका १०० गुणांची असणार आहे. परीक्षा पूर्णपणे मोफत असून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

या परीक्षेतून मोठ्या गटात प्रथम क्रमांकास दहा हजार एक, द्वितीय सात हजार एक, तृतीय पाच हजार एक तसेच लहान गटात प्रथम क्रमांकास पाच हजार एक, द्वितीय तीन हजार पाचशे एक व तृतीय दोन हजार पाचशे एक रुपये तसेच सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे.

या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटून, फोन करून किंवा एसएमएसद्वारे ८००७५१८४३८, ९६७३७५१३०९ या क्रमांकांवर १० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी परिसरातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com