फुलवडेतील बरकीदरा तलाव कोरडा

फुलवडेतील बरकीदरा तलाव कोरडा
Published on

फुलवडे, ता. २१ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील बरकीदरा पाझर तलाव कोरडा पडला आहे. यामुळे तलावावर अवलंबून असलेल्या उघडेवाडी, बरकीदरा, हिलेवाडी, लोहकरेवस्ती, मोहरेवाडी येथील शेतकरी कुटुंबांना शेतीच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे या पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पावसाळ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने बरकीदरा तलाव पूर्णपणे भरतो. त्यामुळे तलावातील पाणी वर्षभर पुरते. परंतु गेल्या चार वर्षात पडणाऱ्या मुसळधार पावसाने डोंगर उतारावरून वाहून आलेला गाळ तलावात साचल्याने व सांडव्यातून पाण्याची होणारी गळती यामुळे फेब्रुवारी महिन्यातच तलावातील पाणी तळ गाठते. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यातच या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते.

पाझर तलावातील सुमारे २ हेक्टर क्षेत्रात हा गाळ साचलेला आहे. या तलावातील गाळ काढल्यास पाणी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जनावरांच्या व रानातील पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पाझर तलावातील गाळ काढून सांडव्यातून पाण्याची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

03045

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com