घमाचीवाडी येथे तळ्यच्या खोलीकरणास प्रारंभ

घमाचीवाडी येथे तळ्यच्या खोलीकरणास प्रारंभ

फुलवडे, ता. ६ : फदालेवाडी-उगलेवाडी (ता. आंबेगाव) येथील घमाचीवाडीत लोकसभागातून शिवकालीन पाण्याच्या तळ्याच्या खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ गुरुवारी (३० मे) करण्यात आला. यासाठी सकाळ रिलीफ फंड, भोसरी येथील न्यूमन अँड इस्सार इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

घमाचीवाडीत ३५ फूट लांबी, ३५ फूट रुंदी व २० फूट खोली असलेले शिवकालीन तळे आहे. या तळ्यातील पाणी वर्षभर पुरत नसल्याने या तळ्याचे खोलीकरण केल्यास पाणीसाठ्यात वाढ होऊन वर्षभर पाणी पुरेल व ग्रामस्थांचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून सकाळ रिलीफ फंडाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार अतिरिक्त १५ फूट खोलीकरण कामास मंजुरी मिळाल्याने या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच विनोद उगले, उपसरपंच विलास उगले, ग्रामसेवक गणेश कर्पे, ठेकेदार किरण लवंगे, देवराम उगले, शांताराम उगले, भोरू उगले, महादू लोहकरे, नथू भोते, भाऊसाहेब उगले, गणपत उगले, बाळासाहेब उगले, पार्वती लोहकरे, रखमा उगले, तुळसा उगले, मनाबाई उगले, मनीषा उगले, हौसाबाई उगले, मीरा उगले, कमल उगले, पुष्पा उगले, सुमन उगले, सुलाबाई भोते उपस्थित होते.

‘‘शिवकालीन तळ्याचे अधिक १५ फूट खोलीकरण केल्यास ५ लाख १७ हजार ५९३ लिटर पाणीसाठा वाढून एकूण पाणीसाठा १२ लाख ११ हजार ३५५ लिटर होणार असल्याने वर्षभर वाडीतील कुटुंबांचा व जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
- रामचंद्र उगले, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक, पुणे शहर. (घमाचीवाडी ता. आंबेगाव).

03080

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com