आदिवासी आश्रमशाळांमधील
कर्मचाऱ्यांचे सोमवारी आंदोलन

आदिवासी आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांचे सोमवारी आंदोलन

Published on

फुलवडे, ता. ५ : आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सिटू संलग्न) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवारी (ता. ८) होणार असल्याची माहिती संघटनेच्या घोडेगाव (ता. आंबेगाव) प्रकल्प कार्यकारिणीचे अध्यक्ष आनंदा मांजरे यांनी दिली.
राज्यात सध्या आदिवासी विकास विभागाच्या ४९७ शासकीय व ५३९ अनुदानित आश्रमशाळा सुरू असून, त्यामध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेची वेळ सकाळी ८.४५ ते दुपारी ४ अशी आहे. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे आश्रमशाळा पूर्ववत सकाळी ११ ते ५ अशी करावी. तसेच, आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेसाठी लागू असलेला काम नाही वेतन नाही, हा जाचक निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह जुनी पेन्शन योजना लागू करणे, निवृत्तीचे वय ६० करणे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणे, नवीन आकृतिबंध रद्द करून विलोपित झालेली पदे पुनर्जीवित करणे, रोजंदारी व कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे आदी मागण्यांसाठी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कऱ्हाड, राज्य सरचिटणीस डॉ. प्रा. बी. टी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येत आहेत. त्यात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने मांजरे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.