फुलवडे येथील ग्रामस्थांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

फुलवडे येथील ग्रामस्थांचे 
एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
Published on

फुलवडे, ता. ३० : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील धरती आबा भगवान बिरसा मुंडा चौकात सोमवारी (ता. ३०) धनगर व बोगस जातींचे खऱ्या आदिवासींच्या आरक्षणात बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले.

धनगर समाजाचे आदिवासी एसटी आरक्षणात समावेश करण्यात येऊ नये. सरकारने शिंदे समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, टाटा टीस इन्स्टिट्यूट समितीचा अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा, पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदावर निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्या, आदिवासींचे बोगस दाखले घेऊन नोकऱ्या बळकाविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा आदी मागण्यांसाठी हे उपोषण केले असून मुंबई मंत्रालयातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब हे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. त्यांना आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

धनगरांना आदिवासी आरक्षणात समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले आहे. त्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली आहे. याला आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे. जर आजच्या उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही तर सर्व आदिवासी बांधव याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते आदिनाथ हिले यांनी सांगितले. या उपोषणाला आदिवासी भागातील बुधाजी डामसे, उमाताई मते, दिनेश गभाले यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते, सहयोगी संघटना आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी सरपंच बबन मोहरे, माजी ग्रामपंचायत आदिनाथ हिले, बिरसा ब्रिगेड आंबेगावचे अध्यक्ष आनंद मोहरे, कृष्णा भारमळ, तुळशीराम बांबळे, हर्षल हिले, पोलिस पाटील शरद मोहरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जंगले, तनुजा मोहरे, कुसुम गभाले, मेजर नारायण हिले, राजकुमार लोहकरे, कचर साबळे, चंद्रकांत गभाले, मनोहर मोहरे, नाथा मोहरे, तसेच ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com