फुलवडेत बैलांना पारंपरिक साज

फुलवडेत बैलांना पारंपरिक साज
Published on

फुलवडे ता. ३, फुलवडे (ता.आंबेगाव) येथे दरवर्षीप्रमाणे भाद्रपदी बैलपोळा हा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांबरोबर वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजे बैलपोळा. बैलांना अंघोळ घालून, बाशिंग बांधून, फुगे, मणी-माळ, रंगरंगोटी आदी पारंपरिक साज परिधान करून सायंकाळी ६ वाजता हलगी, ढोल, ताशाच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये तरुणांचा उत्साह दिसून येत होता.
शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल हे आहेत. त्यामुळे वर्षातून एकदा येणारा ''बैलपोळा'' हा सण ते मोठ्या उत्साहात साजरा करतात.

03385

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com