आंबेगावातील स्ट्रॉबेरी उत्पादकांचा महाबळेश्वरला अभ्यास दौरा
फुलवडे, ता. ९ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील ५५ स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी व महिलांसाठी महाबळेश्वर येथे दोन दिवसांचे स्ट्रॉबेरी काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि विक्री व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत महाबळेश्वर येथे असणाऱ्या गहू गेरवा संशोधन केंद्रामधील स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रामध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. आंबेगावचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या हस्ते अभ्यास दौऱ्याचे उद्घाटन मंगळवारी (ता. ४) पार पडले. या अभ्यास दौऱ्यादरम्यान कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर, आंबेगाव तालुक्यातील कृषी सहाय्यक अरविंद मोहरे, ज्ञानेश्वर लोहकरे शेतकऱ्यांसोबत उपस्थित होते. तसेच कराड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे गृहपाल कानिफनाथ कदम उपस्थित होते.
यावेळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दर्शन कदम यांनी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचे काढणीपश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. मनीष सुशीर यांनी स्ट्रॉबेरीचे एकात्मिक किड-रोग नियंत्रण विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर येथील मधुसागर या फळांचे मूल्यवर्धन करणाऱ्या सहकारी संस्थेला भेट दिली.
अभ्यास दौऱ्यात स्ट्रॉबेरीचे रोड साईड मार्केटिंग, मॅप्रो कंपनीला भेट देऊन स्ट्रॉबेरी फळापासून तयार केलेली उत्पादने शेतकऱ्यांनी पाहिली. वाई येथील पनेट तयार करणाऱ्या औद्योगिक कंपनीला भेट दिली.
03791
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

