गोहे आश्रमशाळेत एकपात्री प्रयोग

गोहे आश्रमशाळेत एकपात्री प्रयोग

Published on

फुलवडे : गोहे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत जागतिक महिला दिनानिमित्ताने एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षिका माधुरी सगर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राणी दुर्गावती व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचार्य सुखदेव आरसुळे यांच्या शुभहस्ते करून स्त्रीशक्तीला अभिवादन केले.
विद्यार्थिनींमधून शिवांजली भोईर, आदिती भरमळ, संचिता दाते, साधना गवारी यांनी अनुक्रमे ‘होय मी जिजाऊ बोलते.., मी क्रांतिज्योती सावित्रीबाई.., मी आहे झाशीची राणी..’, व ‘मी सिंधूताई बोलते’ या एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण केले. तसेच काही विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त भाषणे व गीतांचे गायन केले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे व बनवलेल्या भित्तीचित्रांचे प्रदर्शनही यावेळी मांडले होते. या एकपात्री प्रयोगांचे नाट्यलेखन व दिग्दर्शन प्रा. कोमल नाईकडे यांनी केले होते.
याप्रसंगी प्रा. रेखा पवार व प्राचार्य सुखदेव आरसुळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. नांदी फाउंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या नन्ही कली उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संजय ढमढेरे, अजित रावते, प्रमोद मंगनाळे, विनोद जाधव, सीताराम गवारी, गजानन असवले, सागर पडघम व विद्यार्थी उपस्थित होते. तान्हाजी बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन व पल्लवी शेजवळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com