पोखरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा

पोखरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा

Published on

फुलवडे, ता. १४ : पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान विभागामार्फत महाळुंगे तर्फे घोडा येथील मुक्ताईदेवी देवराई येथील रोपवाटिका व डिंभे धरणातील मत्स्य प्रकल्प येथे अभ्यासदौरा आयोजित केला होता.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांना भविष्यासाठी वेगळा दृष्टिकोन मिळावा, या उद्देशाने प्राणिशास्त्र आणि जीवशास्त्र या दोन विषयांच्या दृष्टीतून अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनी सांगितले.
रोपवाटिकेत १०१ प्रकारच्या विविध औषधी व स्थानिक वृक्ष प्रजाती, महाकाय बांबू, अटळ वन धन रोपवन, गांडूळ खत प्रकल्प यांचा पाहणी करून प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. प्राणिशास्त्रासाठी डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या मत्स्य प्रकल्पाला भेट देऊन मत्स्य व्यवसाय करून रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो? याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.
प्रकल्पामध्ये पंकज व तिलापी या दोन जातींच्या माशांचे मुख्यत्वे संवर्धन केले होते. त्या मत्स्य प्रजातींची माहिती प्रफुल्ल सरांनी विद्यार्थ्यांना दिली. या अभ्यासदौऱ्यात विज्ञान विभागाच्या प्रा. अश्‍विनी दांगट, प्रा. प्रशिक साळवे व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com