असाणे येथील सरळसेवा परीक्षेत ३०२ विद्यार्थ्यांचा सहभाग

असाणे येथील सरळसेवा परीक्षेत  
३०२ विद्यार्थ्यांचा सहभाग
Published on

फुलवडे, ता. ११ ः असाणे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी क्रांती संघटनेने श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सवाचे औचित्य साधून आगामी सरळसेवा भरतीच्या धर्तीवर चौथ्यांदा सराव लेखी परीक्षेचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, असाणे याठिकाणी ३१ मार्च रोजी केले होते. या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ७) जाहीर केला. या परीक्षेत आंबेगाव, जुन्नर, खेड, तालुक्यातील तसेच पालघर जिल्ह्यातील विविध भागातून एकूण ३०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती आदिवासी क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर ठुबळ यांनी दिली.

प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे परीक्षार्थी
मोठा गट (११ वी ते पदवी)
सोमनाथ विठ्ठल उतळे (अंजनावळे, ता. जुन्नर), गुण ६४.
ऋतिक बाळू चिमटे (आंबे ता. जुन्नर), गुण ६३.
लक्ष्मण भिका साबळे (राजेवाडी, ता. आंबेगाव), गुण ६०.
• लहान गट (५ वी ते १० वी)
सार्थक बारकू गवारी (हिवरे तर्फे मिन्हेर, ता. जुन्नर), गुण ७१.
अपेक्षा शंकर गवारी (तिरपाड, ता. आंबेगाव), गुण ७०.
श्रेयश बाळू बांबळे (असाणे ता. आंबेगाव), गुण ६८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com