डिंभे धरणात १२ टीएमसी पाणीसाठा
फुलवडे, ता. २६ : डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात मंगळवारी (ता. २६) सकाळी सहा वाजता १२.१३२ टीएमसी म्हणजे ९७.१० टक्के पाणीसाठा
झाला आहे. सांडव्यातून चार हजार ३३० क्यूसेक, वीजघर ५५० क्यूसेक, उजवा कालवा १०० क्यूसेक असा एकूण चार हजार ९८० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
डिंभे धरण क्षेत्रात जून महिन्यापासून आजअखेर ९१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणाचा पाणीसाठा ९७.०१ टक्के इतका होता. तर १७३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
कुकडी प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा २४.३१५ टीएमसी म्हणजेच ८१.९३ टक्के इतका झाला असून, गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा २२.२७४ टीएमसी म्हणजेच ७५.०५ इतका होता. त्यामुळे या वर्षी ६ टक्क्याहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
कुकडी प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा व पडलेला पाऊस
धरणाचे नाव.....टीएमसी.....टक्केवारी.....पाऊस (मिलिमीटरमध्ये)
डिंभे........१२.१३२.......९७.१०.......९१४
येडगाव.......१.९४३.......१००.......३१५
माणिकडोह.......५.६०१.......५५.०३.......५३८
वडज.......१.१४८.......९७.८५.......४६१
पिंपळगाव जोगे.......३.४८८.......८९.६७.......५१५
04386
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.