बोरघरमध्ये ‘जागरूक मी, सक्षम मी’ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर
फुलवडे ता. २९, “प्रत्येक मुलीने, महिलेने आपल्याला जाणवणाऱ्या वेगळ्या संवेदना ओळखून योग्य निर्णय योग्य वेळी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रसंगी धोका जाणवला तर ताबडतोब पालकांना सांगावे. शिक्षण पूर्ण करून सक्षम व्हा. कारण शिक्षणाबरोबर जबाबदारी आणि कर्तव्य ही तेवढीच महत्त्वाची आहेत.” असे प्रतिपादन स्नेहाधार प्रकल्प, पुणे येथील शुभांगी कोपरकर यांनी केले.
बोरघर (ता. आंबेगाव) येथील आनंद कपूर प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी (ता. २८) शाश्वत संस्था मंचर यांच्यातर्फे आयोजित ‘जागरूक मी, सक्षम मी’ अंतर्गत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन या शिबिरात त्या बोलत होत्या.
शिबिरात मुलींना बोलते करण्यासाठी विविध प्रश्नोत्तरांची पद्धत अवलंबली गेली. मुलींच्या शरीरात व मनात होणाऱ्या बदलांविषयी तसेच गुड टच-बॅड टच याविषयी माहिती दिली. तसेच पाहुणे, नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती इतर पुरुष व्यक्तींशी सुरक्षित अंतर ठेवून राहावे, त्यांनी धोके कमी होऊ शकतात, अशा काही सूचना मुलींना देण्यात आल्या.
शिबिरासाठी बालवीरवाडी, पिंपरगणे, डोन, न्हावेड, नानवडे, तिरपाड, आमडे, असाणे, माळीण, कुशिरे, पिंपरी, महाळुंगे, जांभोरी, साकेरी येथील ११६ मुली १९ पालक, कार्यकर्ते उपस्थित होते. नियोजन शाश्वतच्या विश्वस्त सुलोचना गवारी, प्रतिभा तांबे तसेच अरुण पारधी, तेजश्री कसबे, शांताराम गुंजाळ यांनी केले. शिबिरासाठी आर्थिक सहकार्य केळकर ऑटो पार्टस पुणे यांचे लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

