निगडाळे-म्हतारबाची वाडीतील इमारतीची दुरवस्था
फुलवडे, ता. २२ : निगडाळे-म्हतारबाची वाडी (ता. आंबेगाव) येथे इमारतीची दुरवस्था झाली आहे. तिच्या डागडुजीची गरज आहे. पावसाळ्यात इमारतीत मोठ्या प्रमाणात गळती होते. यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच पशुपालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे इमारत सुसज्ज करण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.
तेरुंगण, कोंढवळ व निगडाळे या गावांमधील सुमारे २५०० पशुधनांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ सुरू आहे. याठिकाणी पशुधन पर्यवेक्षक म्हणून डॉ. एम. डी. सुरकुले, परिचर म्हणून सोपान मोरमारे हे कार्यरत आहेत. दवाखान्याअंतर्गत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यासारख्या सुमारे २५०० जनावरांवर औषधोपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, वासरे जन्म नोंदी, गर्भधारणा तपासणी, वंधत्व तपासणी यासारखे उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबवले जात असल्याचे पशुपालक योगेश लोहकरे, किसन लोहकरे, गोविंद लोहकरे, दत्तात्रेय वनघरे, शंकर केदारी, काळू असवले, शंकर कोंढावळे, ज्ञानेश्वर कवटे, मोतीराम डामसे, शांताराम डामसे, नामदेव कोंढवळे यांनी सांगितले.
याची आहे गरज
- इमारतीची सुधारणा
- स्वच्छता गृह
- पाण्याची व्यवस्था
लसीकरण
लंपी............ ९६१
लाळ्या............ ८६०
घटसर्प............ ४८०
आंत्रविषार............ १९०
वंध्यत्व निर्मूलन............ १२१
फऱ्या............ ९५
कृत्रिम रेतन............ ६२
वैरण बियाणे वितरण
मका १८० किलो
एकूण वार्षिक चारा उत्पादन (टनांत)
हिरवा............ २७००
सुका............ ९०० टन
काही पशुपालकांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येते. परंतु सदर आजार उद्भवल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी शासनातर्फे दिले जाणारे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. एम. डी. सुरकुले, पशुधन पर्यवेक्षक, निगडाळे (म्हतारबाची वाडी).
04647
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

