असाणे येथे काफ्रीच्या रोपांचे वाटप

असाणे येथे काफ्रीच्या रोपांचे वाटप

Published on

फुलवडे, ता. २७ : असाणे (ता. आंबेगाव) तसेच पंचाळे खुर्द व बुद्रुक येथील ७० शेतकऱ्यांना काफ्री फुलांच्या रोपांचे वाटप मंगळवारी (ता. २५) करण्यात आले, अशी माहिती जुन्नरमधील शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी दिली.

स्वतःच्या शेतात काम व रोजगार मिळावा. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे यासाठी रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटी पुणे यांच्या आर्थिक मदतीतून व मार्गदर्शनाने काफ्री फुलशेती प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फुलशेतीसाठी शेतकरी व महिलांना रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटी पुणे यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. असाणे परिसरातील चार गावांमधील १०० शेतकऱ्यांबरोबर सन २०२४-२५ मध्ये हा उपक्रम राबविला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांना खर्च वजा जाता प्रतिकुटुंब २५ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत फायदा झाला. तीन महिन्यात फुलांचे उत्पन्न सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना हा उपक्रम फायदेशीर ठरला.
दरम्यान, आदिवासी विकास विभागामार्फत न्युक्लियस बजेट अंतर्गत शेतीसाठी मदत मिळाली तर आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व त्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही. त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होईल, असे डामसे यांनी सांगितले.

04665

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com