ग्रामस्थांसमोर मांडणार समितीचा लेखाजोखा

ग्रामस्थांसमोर मांडणार समितीचा लेखाजोखा

Published on

भीमाशंकर ता. ११ : ‘‘सर्व समित्यांचे शासकीय तसेच बचत खात्याशी संबंधित दस्तावेज पुढील आठवड्यात प्रत्येक गावात समितीची स्वतंत्र बैठक घेऊन ग्रामस्थांसमोर सादर करण्यात येतील. हे दस्तावेज संबंधित गावांमध्ये नागरिकांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यात येतील,’’ असे आश्‍वासन भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी दिले.
भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयात मंगळवारी (ता. ६) भीमाशंकर अभयारण्य परिसरातील वनविभागाच्या कामकाजासंदर्भात आठ गावातील ग्रामस्थ, युवकांची अधिकृत बैठक पार पडली त्यावेळी जाधव बोलत होते. याप्रसंगी निगडाळे ग्राम परिस्थिती विकास समितीच्या अध्यक्षा अनिता लोहकरे, तसेच हरिश्चंद्र लोहकरे, करण कोंढवळे, ग्राम परिस्थिती विकास समितीचे अध्यक्ष खंडू बाणेरे, लहू मेठल, रोहन बाणेरे, ओंकार बाणेरे, दीपक बांगर, अजय सोनवणे, अजित काठे, गणेश सुपे, अजित कवटे, सचिन कारोटे आदी सदस्य तसेच घोडेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत ग्राम परिस्थिती विकास समित्यांचा कारभार, निधी व्यवस्थापन, स्थानिक सहभाग आणि पारदर्शकता या मुद्द्यांवर ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली होती. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांशी संबंधित शासकीय व बचत खात्यांचे दस्तावेज, वनविकास कामांतील स्थानिक सहभाग, समित्यांच्या नियमित बैठका तसेच निधी उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यापुढे होणाऱ्या सर्व वनविकासाच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येईल तसेच प्रत्येक गावात ग्राम विकास समित्यांच्या नियमित बैठका आयोजित करण्यात येतील, जेणेकरून प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल. पुढील काळात संवाद, पारदर्शकता आणि स्थानिक सहभागाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लेखी स्वरूपात स्पष्ट माहिती देवू
बैठकीत निगडाळे ग्रामपरिस्थितीकी विकास समितीच्या बचत खात्याबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला. या समितीमध्ये वनरक्षक यांची ‘सदस्य सचिव’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती ग्रामसभेची लेखी मंजुरी न घेता करण्यात आल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली. यावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ही नियुक्ती कोणत्या शासन परिपत्रक अथवा नियमांच्या आधारे करण्यात आली आहे, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून लेखी स्वरूपात स्पष्ट माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले.

4817

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com