डिंभे धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक
फुलवडे, ता. ५, डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात गुरुवारी (ता. ५) सकाळी सहा वाजताचा ७.३९४ टीएमसी म्हणजेच ५९.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणाच्या डावा ६७५ व उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने ८७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यंदा धरण २८ सप्टेंबरला १०० टक्के भरले होते. परंतु सध्या धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी धरणात ५० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात ९ टक्क्यांनी वाढ दिसून येत असली तरी धरणातील पाणी एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण म्हणून डिंभे हे धरण आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रातील सुमारे सात हजार ४४८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे.
जिल्ह्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे या पाच प्रमुख धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार करण्यात आला असून पाच मार्च रोजी सकाळी सहा वाजता कुकडी प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ५७.६२ टक्के म्हणजेच १७.१०१ टीएमसी इतका शिल्लक आहे.
धरणांतील गुरुवारचा पाणी साठा
धरण .......टक्केवारी.......टीएमसी
डिंभे .......५९.१८ .......७.३९४
वडज.......७१.२८.......०.८३६
येडगाव.......९१.४९.......१.७७८
माणिकडोह.......४७.९४.......४.८७९
पिंपळगाव जोगे.......५६.८७.......२.२१२
कुकडी प्रकल्प एकूण साठा.......५७.६२.......१७.१०१
04988
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

