कोंढाणा संघाने पटकविला ‘कोंढवळ चषक’

कोंढाणा संघाने पटकविला ‘कोंढवळ चषक’
Published on

भीमाशंकर, ता. २९ ः म्हातारबाची वाडी (ता. आंबेगाव) येथील पी. पी. लोहकरे स्टेडियमवर २५ व २६ मार्च रोजी ग्रुप ग्रामपंचायत ‘कोंढवळ चषक २०२६’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेमध्ये गुरुवारी (ता. २६) झालेल्या अंतिम सामन्यात ‘पन्हाळा’ संघाचा पराभव करत ‘कोंढाणा’ संघाने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. या स्पर्धेचे उद्‍घाटन माजी सरपंच दीपक चिमटे, पोलिस पाटील सुभाष कारोटे यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ सरपंच सविता तिटकारे, ग्रामविकास अधिकारी तारडे भाऊसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या क्रिकेट स्पर्धेत कोंढाणा, पन्हाळा, तोरणा, राजगड, सिंहगड व शिवनेरी या संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात कोंढाणा संघाचा संघनायक प्रदीप दाते व संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत हा चषक पटकावला. मालिकावीर म्हणून प्रदीप दाते (कोंढाणा), उत्कृष्ट फलंदाज दत्तू असवले (पन्हाळा), उत्कृष्ट गोलंदाज सचिन कारोटे (राजगड), उत्कृष्ट झेल जालिंदर गेंगजे (कोंढाणा) यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

05050

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com