सावरली येथे आढळले सातवाहनकालीन जाते

सावरली येथे आढळले 
सातवाहनकालीन जाते
Published on

फुलवडे, ता. ७ : सावरली (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरणाची पाणी पातळी घटल्याने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन जाते सापडले आहे. जुन्नर-आंबेगाव कट्ट्याचे सदस्य अरविंद मोहरे व सागर हगवणे यांनी ही माहिती दिली असून, ग्रामस्थांनी या ऐतिहासिक वारशाच्या जतनाचे आवाहन केले आहे.
डिंभे धरण होण्यापूर्वी घोड नदीकाठी वसलेले सावरली गाव पूर्णतः पाण्याखाली गेले होते. सध्या पाणी ओसरल्याने गावाचे अवशेष दिसू लागले असून, त्यात हे आडव्या दांड्याचे प्राचीन जाते आढळले. जुन्नर ही सातवाहनांची उपराजधानी आणि नाणेघाट हा प्रमुख व्यापारी मार्ग असल्याने या परिसरात सातवाहनकालीन अवशेष मोठ्या प्रमाणावर आढळतात, असे जुन्नर-आंबेगाव कट्ट्याचे संस्थापक विनायक खोत यांनी सांगितले. या शोधामुळे परिसराच्या ऐतिहासिक समृद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

05073

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com