दापोडी प्रभागात भाजपची 
सामाजिक समतेची साद

दापोडी प्रभागात भाजपची सामाजिक समतेची साद

Published on

जुनी सांगवी, ता. ७ : प्रभाग क्रमांक ३० दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी परिसरात भाजपने सामाजिक समतेची साद घालत घरभेटी, पदयात्रा व संवादातून विकासाचा निर्धार व्यक्त केला आहे.
कष्टकरी, विविध समाज घटकांचा प्रभाग अशी ओळख असलेल्या दापोडी प्रभागात भाजपच्या वतीने सामाजिक समतेचा संदेश देणारे व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात येत असून, त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या प्रभागातून उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंढे, प्रतिभा जवळकर, संजय ऊर्फ नाना काटे या भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील वाझ चाळ, साळवे चाळ, जाधव चाळ, काची चाळ, गुलाब काटे चाळ व जयभीमनगर भागांत संपर्क अभियान राबविण्यात आले. या दरम्यान, विकास, मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षितता, वीजपुरवठा तसेच कायदा व सुव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर भर देण्यात येत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाचा संदेश उमेदवार व कार्यकर्ते नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहेत.
भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या, तक्रारी व अपेक्षा जाणून घेतल्या. सार्वजनिक स्वच्छतागृहे व सुरक्षिततेसंबंधीच्या समस्या मांडल्या. या प्रश्नांची नोंद घेऊन संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
या भेटीदरम्यान होली क्रॉस चर्चचे फादर अल्बर्ट फर्नांडिस यांनी ख्रिस्त बांधवांच्या समस्या मांडल्या. दफनभूमीसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्याची गंभीर अडचण त्यांनी उमेदवारांच्या निदर्शनास आणून दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत दफनभूमीच्या जागेचा प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन संजय नाना काटे व इतर उमेदवारांनी ख्रिस्त बांधवांना दिले. यावेळी अरविंद पंडित, हॅरी अँथोनी, सतीश पटेकर, सनी गजभिव, दाविद बळीद, रतन जाधव, नितीन गायकवाड, किशोर तुपे, सेल्वराज सेबास्टियन, स्टेला वाज, अगस्ती डिसोझा, लिओनेल वाज आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com