उशिरा सुरुवात, संथ मतमोजणी, निकालही दिरंगाईने

उशिरा सुरुवात, संथ मतमोजणी, निकालही दिरंगाईने

Published on

पिंपरी, १६ : मतमोजणीला उशिराने झालेली सुरवात, संथपणे येणारे निकाल, उशिरा निकाल आल्याने आधी शुकशुकाट, निकालाचे कल समजताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष..असे वातावरण निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे शुक्रवारी (ता.१६) दिसून आले.

पिंपरी चिंचवड महापालिका ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १०, १४, १५ आणि १९ येथील मतमोजणी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे पार पडली. मात्र, टपाली मतमोजणीलाच जवळपास अर्धा तास उशिराने सुरूवात झाली. काही टेबलवरील मतमोजणी संथगतीने झाल्याने पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्यास तब्बल दोन तास लागले. प्रभाग क्रमांक १४ व १९ मधील काही अत्यंत चुरशीच्या झाल्या. या लढतींचे निकाल जाणून घेण्याची उत्सुकता कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. त्यामुळे निकालाचे चित्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये स्पष्ट झाले आणि विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
यामध्ये प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपचे उमेदवार राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला बाबर, शैलजा मोरे यांचे पॅनेल निवडून आले. पहिल्या फेरीपासूनच या चौघांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीनंतर मतांमधील अंतर वाढत गेले. दुपारी चारच्या सुमारासच मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. संबळ, हलगी वाजवत गुलाल उधळण करत या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
आकुर्डी गावठाण, काळभोरनगर, मोहननगर या प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत ३ जागा मिळवल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरुणा लंगोटे आणि भाजपच्या ऐश्वर्या बाबर यांच्या मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अरुणा लंगोटे विजयी झाल्या. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी बाजी मारली कार्यकर्त्यांनी विजयाचा एकच जल्लोष साजरा केला.
प्रभाग क्रमांक १० मध्येही पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये चुरस पहायला मिळाली. भाजपच्या अनुराधा गोरखे पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मागे होत्या; मात्र चौथ्या फेरीनंतर चित्र बदलले आणि त्यांनी विजयी आघाडी घेतली. तिन्ही प्रभागांतील भाजपच्या विजयी उमेदवारांनी एकत्रित जल्लोष केला.
तर प्रभाग क्रमांक १९ मध्येदेखील भाजपच्या उमेदवार विजयी झाले. मात्र, प्रभागातील ‘ड’ गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काळुराम पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये मतमोजणीवर आक्षेप घेतला.

PNE26V86798

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com