वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काळवाडीत येथे बिबट्या जेरबंद

वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काळवाडीत येथे बिबट्या जेरबंद

पिंपळवंडी, ता.१३ : काळवाडी (ता.जुन्नर) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. काळवाडी येथील रुद्र महेश फापाळे या आठ वर्षीय मुलाचा बुधवारी (ता.८) बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. घटनास्थळापासून काही अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे सहा वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली. या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

पिंपरी पेंढार येथे एका महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला होता तसेच पिंपळवंडी येथील एक तरुणी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली होती. यानंतर वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात अनेक पिंजरे लावलेले होते.चार दिवसात या पिंजऱ्यात एकूण पाच बिबटे जेरबंद झालेले आहेत तसेच काही दिवसांपूर्वी उंब्रज परिसरात देखील चार ते पाच बिबटे वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केलेले होते. यावरून पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज व पिंपरी पेंढार या परिसरात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते.
02036

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com