जालन्यातील महिलांकडून दहा ड्रम थेअरीची पाहणी
पिंपळवंडी, ता. ६ : काळवाडी (ता.जुन्नर) येथे जालना जिल्ह्यातील सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अभ्यास दौरा नुकताच पार पडला. वॉटर या स्वयंसेवी संस्थेच्या शेतकरी उत्पादक कंपनीतील ८० महिला या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या.
काळवाडी येथील डेक्कन व्हॅली फार्मर्स कंपनी व शाश्वत फार्मिंग फाउंडेशनद्वारे उभारलेल्या दहा ड्रम थेअरी युनिटची पाहणी करत या महिलांनी प्रत्यक्ष उपयुक्तता अनुभवली. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी सरपंच अंजली वामन यांनी सांगितले की, निरोगी व अर्थपूर्ण समाजासाठी विषमुक्त शेतीचे महत्त्व विशद केले. या कामी परसबाग हा महत्त्वाचा घटक आहे, यामुळे आपले कुटुंब निरोगी राहते.
डेक्कन व्हॅली एफ.पी.सी च्या संचालिका निलम बेल्हेकर यांनी दहा ड्रम थेअरी उभारणी व अनुभव कथन करताना सांगितले की, केळी पिकामध्ये खूप प्रभावी वापर केल्याने उत्पादन खर्च ५० टक्के पेक्षा कमी झाला असून, सेंद्रिय कर्ब एक टक्के पेक्षा जास्त तयार झाला. उत्पन्न देखील २० टक्यांनी वाढले. सर्वच पिकांसाठी ही थेअरी उपयुक्त आहे.
वॉटर संस्थेच्या वंदना देशपांडे, शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे जे.वगरे, काळवाडी ग्रामसेवक रवींद्र जाधव, संदीप काकडे, सुनील वामन, अजय बेल्हेकर व शेतकरी उपस्थित होते.
02064
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.