पिंपळवंडी येथे अपघातात एक जण ठार

पिंपळवंडी येथे अपघातात एक जण ठार
Published on

पिंपळवंडी, ता. ३ : पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे सोमवारी (ता. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रामदास रघुनाथ कुतळ (वय ६८, रा. नगदवाडी, ता. जुन्नर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
रामदास कुतळ हे दुचाकीवरून रस्ता ओलांडताना नारायणगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांची दुचाकी ट्रकखाली आली व त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बोरवेल मशिन वाहतूक करणारा हा ट्रक होता.
अनिकेत शंकर गोपाळे (रा. बेलापूर, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा ट्रकचालक ट्रक चालवत होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मंगेश रामदास कुतळ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे ए. पवार करत आहेत.
येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग हा तीव्र उताराचा आहे. या ठिकाणी गतिरोधक बसविले असतानाही हा अपघात झाला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे चौक असून पिंपळवंडी, भटकळवाडी आदी ठिकाणी जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो. शाळकरी मुले, महिला, वृद्ध आदींना येथे रस्ता ओलांडताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी रस्ता पार करण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्याची मागणी विवेक काकडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com