वैशाखखेडे परिसरात शेळी, कुत्र्याचा मृत्यू

वैशाखखेडे परिसरात 
शेळी, कुत्र्याचा मृत्यू
Published on

पिंपळवंडी, ता. २८ : वैशाखखेडे (ता. जुन्नर) येथे गुरुवारी(ता. २७) दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व कुत्र्याचा मृत्यू झाला.
कैलास बर्डे हे त्यांच्या शेळ्या कुकडी नदी किनारी चारत असताना बिबट्याने त्यांच्या शेळीवर हल्ला करून तिला ओढत नेले. त्यांच्या कुत्र्याने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने शेळीला सोडून कुत्र्यावर हल्ला केला. त्यात कुत्रा देखील जागीच ठार झाला. या घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दिवसा बिबट्याचे हल्ले होत असल्याने पिंपळवंडी पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com