पिंपळवंडीत लोणीकरांविरोधात उपोषण
पिंपळवंडी, ता. ३ : शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे आमदार बबनराव लोणीकर यांच्या राजीनाम्यासाठी पिंपळवंडी(ता.जुन्नर) येथील मळगंगा मंदिराच्या प्रांगणात शेतकरी निवृत्ती वाघ हे बुधवारी(ता.२) उपोषणास बसले आहेत. त्यास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जे शेतकरी विरोधी बेताल वक्तव्य केले त्याच्या विरोधात जुन्नर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून जोपर्यंत बबनराव लोणीकर हे जाहीरपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागत नाहीत तसेच त्यांच्या पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे निवृत्ती वाघ यांनी सांगितले.
शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांबद्दल या प्रकारचे वक्तव्य हे सत्ता पक्षातील आमदाराने करणे याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडा आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी सांगितले.
यावेळी जुन्नर पतसंस्था फेडरेशनचे महादेव वाघ, माजी सभापती संगीता वाघ, सरपंच मेघा काकडे, संदीप लेंडे, मंगेश ककडे, निर्भय महाराष्ट्रचे संदीप नाईक, सह्याद्री शेतकरी संघटनेचे रमेश शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, तान्हाजी तांबे, सोपान लेंडे, आंबादास हांडे, संजय भुजबळ, अजित वाघ, डॉ.दत्ता खोमणे, सचिन थोरवे, मनोज शिंदे, सुखदेव लेंडे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे उपस्थित होते.
02520
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.