हिवरेमधील १८० वर्षांच्या महोगनी वृक्षाला घरघर

हिवरेमधील १८० वर्षांच्या महोगनी वृक्षाला घरघर
Published on

पिंपळवंडी, ता. २६ : हिवरे (ता. जुन्नर) येथे बॉम्बे प्रेसिडेंसीचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी १८० वर्षांपूर्वी स्वहस्ते लावलेला ऐतिहासिक महोगनी वृक्ष सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वृक्षाचे खोड जाळण्यासह फांद्या तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
डॉ. गिब्सन यांनी सन १८३८मध्ये भारतातील पहिले वनसंरक्षण धोरण राबवले होते. हिवरे येथील त्यांच्या निवासस्थानाचे रूपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. याच परिसरात त्यांनी औषधी वनस्पतींचे उद्यान उभारले होते, जे सध्या येडगाव धरणाच्या पाण्यात गेले आहे. या उद्यानाची साक्ष देणारा एकमेव महोगनी वृक्ष आजही उभा आहे. मात्र, अज्ञात घटकांकडून या वृक्षाच्या खोडाचा भाग जाळण्यात आला असून, काही फांद्याही तोडण्यात आल्या आहेत. यामुळे वृक्षाचा काही भाग वाळला आहे. ऐतिहासिक वारसा असलेला हा वृक्ष आणि परिसरातील वटवृक्ष तातडीने जतन करून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

गिब्सन यांनी लावलेल्या महोगनी वृक्षाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यांनी लावलेली अनेक दुर्मिळ वनस्पती आपण वाचवू शकलो नाही. परंतु, हे झाड वाचवून आपण त्यांनी केलेल्या महान वनसंवर्धन कार्याला खरी मानवंदना ठरेल. तसेच, वनसंरक्षण करण्याची सुरुवात पुन्हा येथून सुरू होईल.
- उमा शंकर, वृक्षप्रेमी पर्यटक, आंध्रप्रदेश

या वृक्षाला ‘वारसा वृक्ष’ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गिब्सन संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या वृक्षाला भेट देऊन वृक्ष संवर्धित करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.
- स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर

02854

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com