पिंपळे गुरव येथे साथीचे आजार वाढण्याची भीती

पिंपळे गुरव येथे साथीचे आजार वाढण्याची भीती

Published on

पिंपळे गुरव, ता. १० ः पिंपळे गुरव येथील गजानननगर गल्ली नंबर एकमध्ये अनेक दिवसांपासून ड्रेनेजची लाईन तुंबली आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. तुंबलेल्या ड्रेनेजच्या लाईनचा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. त्या कामांच्या तक्रारी नागरिक मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. मात्र, समस्या सोडविण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गजानननगर भागात सात ते आठ चेंबर आहेत. परंतु, त्यातील काही चेंबर तुंबल्यावर तात्पुरती साफसफाई केली जाते. त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्मार्ट सिटीने केलेल्या कामामुळे ड्रेनेजचे पाणी स्ट्रोम वॉटरच्या लाईनमध्ये येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्यावेळी डासांचा खूप त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या अधिकारी याकडे लक्ष देतील का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. ड्रेनेजची समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

या ठिकाणाची तातडीने स्वतः पाहणी करणार आहे. तसेच या तुंबलेल्या ड्रेनेजच्या लाईनची दुरुस्ती त्वरित करण्यात येईल.
- धनश्री हांडे
कनिष्ठ अभियंता, जलनिस्सारण

येथील रहिवाशांना दुर्गंधीचा रोज सामना करावा लागत आहे. तसेच डासांमुळे येथील नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- आनंद शिंदे
स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.