‍संसार उद्ध्वस्त करणे म्हणजे विकास नव्हे

‍संसार उद्ध्वस्त करणे म्हणजे विकास नव्हे

Published on

पारगाव मेमाणे, या. १५: ‘‍शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणे म्हणजे विकास नव्हे. मोजणीच्या निमित्ताने जबरदस्तीने घेणे जमिनी घेणे कदापी मान्य केले जाणार नाही. विमानतळाच्या प्रश्नावर सरकारच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कमालीची अस्वस्थता दिसते. तुमचे सर्व प्रश्न सरकारपुढे मांडतो. बाधित गावातील दहा लोकांना घेऊन मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासमवेत बसू. तुम्हाला मान्य होणारा, शेवटच्या घटकाचे समाधान करणारा निर्णय होईपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बाधित शेतकऱ्यांना दिली आहे.

खानवडी (ता.पुरंदर) येथे पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवेदन देत शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर विमानताळबाबतच्या समस्या मांडल्या. पवार पुढे म्हणाले, की आमच्या सरकारच्या काळात विमानतळाच्या जागेत बदल केला. नवीन जागा सूचवली. नवीन सरकार येताच तो निर्णय रद्द झाला. विकास प्रकल्प पारदर्शक व विश्वासाने पूर्ण करायचे असतात. त्यासाठी त्यांनी हिंजवडी, मगरपट्टा प्रकल्पाचा दाखला दिला. विमानतळाबाबत काय होईल सांगता येत नाही. मात्र, शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही.
दरम्यान, शासन, जिल्हाधिकारी, स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊ. शेतकरी केंद्रस्थानी म्हणून त्याच्या हिताचाच निर्णय घेण्यासाठी समन्वयाची भूमिका करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, सुदामराव इंगळे, विजय कोलते, दत्तात्रेय चव्हाण, माणिकराव झेंडे, बबूसाहेब माहूरकर, गणेश होले, संतोष हगवणे, सुनील धिवार, तुषार झुरंगे, जितेंद्र मेमाणे, रवींद्र फुले,अनिल मेमाणे, महादेव टिळेकर,चंद्रकांत फुले, मुरलीधर झुरंगे, शांताराम झुरंगे त्यासोबतच सात गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची दिलेल्या निवेदनातील मुद्दे
- आमचा विरोध विमानतळाला नाही तर जागेला
- संमती फक्त मोजणीला, भूसंपादनाला नव्हे.
- मोजणी प्रक्रियेत जबरदस्ती होत आहे.
- शासन पुनर्वसनाच्या मुद्द्यावर काहीही बोलत नाही.
- अधिकारी जमिनी मागतात मात्र मोबदला परतावा याबद्दल काहीही बोलत नाहीत.
- विमानतळ प्रकल्पामध्ये भागधारक बनवावे.

00741

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com