येत्या दोन वर्षांत देहूचा होणार कायापालट ! पुन्हा एकदा नवीन विकास आराखडा तयार होणार

येत्या दोन वर्षांत देहूचा होणार कायापालट !  पुन्हा एकदा नवीन विकास आराखडा तयार होणार
Published on

देहू ग्रामपंचायतीचे सरकारने नगरपंचायतीत आठ डिसेंबर २०२० रूपांतर केले. त्यानंतर देहूत नगरपंचायत प्रशासन येऊन विकासकामे पुन्हा जोमाने आणि जोरात सुरू झालेली आहेत. येत्या दोन वर्षांत देहूचा पुन्हा एकदा नवीन विकास आराखडा तयार होणार आहे. यात भाविक आणि नागरिकांसाठी विविध सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे देहूची विकासाकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
- मुकुंद परंडवाल, देहू

ती र्थक्षेत्र देहू ग्रामपंचायत असताना सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखडा २०१२ पासून राबविण्यास सुरुवात केली. या विकास आराखड्यांतर्गत १७० कोटी रुपयांची विकासकामे देहूत झाली. त्यामुळे देहूचा कायापालट झाला. इंद्रायणी नदीचा घाट, रुंद अंतर्गत रस्ते यामुळे संत तुकाराम महाराज देऊळवाड्याकडे जाताना एक वेगळा अनुभव भाविकांना अनुभवायला मिळतो. त्यातच दिवसेंदिवस देहू आणि परिसरात नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढले. या पार्श्वभूमीवर सरकारने देहूचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले. त्यानंतर परिसरात विकासाचे वारे वाहू लागले. गेल्या दोन वर्षांत विकासाचा वेग अधिक आहे.

येत्या दोन वर्षांत देहूचा पुन्हा एकदा नवीन विकास आराखडा तयार होणार आहे. यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे देहूचे रूप अधिकच पालटणार आहे.

ज्ञानदेव रचिला पाया।
तुका झाला से कळस ।।

या अभंगातील ओवीप्रमाणे सध्या नगरपंचायत प्रशासन आणि तरुण नगरपंचायत सदस्य काम करत आहेत. देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी या तीन गावांचा देहू नगरपंचायतीमध्ये समावेश होतो. सतरा सदस्य नगरपंचायतीमध्ये आहेत. हे सतराही सदस्य युवा आहेत. दीड वर्षाच्या काळात प्रशासकीय कामे शिकून हे सर्वजण प्रशासनाच्या मदतीद्वारे देहूच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. तसेच वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ५२ कोटी रुपयांची नवीन पाणी योजना सुरू करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव करण्यात आला आहे. नगरपंचायतीचा प्रस्तावित विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विविध नवीन योजना आहेत. नागरिकांसाठी बगिचा, मुलांसाठी क्रीडांगण, नगरपंचायतीची नवीन वास्तू कार्यालय यांचा समावेश आहे. भूमिगत सांडपाणी योजना, गावाबाहेरील रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. इंद्रायणी सुधार प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. विविध भागातील चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

देहूचा विकास आराखडा राबविताना सरकारी गायरानावर केवळ मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले. सध्या देहूत दीडशे एकर सरकारी गायरानाची जागा उपलब्ध आहे. या जागेवर देहू नगरपंचायत विविध विकासकामे करणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने भाविकांसाठी भक्तनिवास, पालखी तळ, वाहनतळ उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

देहूतील भव्य प्रवेशद्वार.
(डीयूएच२६पी११०११११).
देहू ः नगरपंचायतीची सध्याची वास्तू.
(डीयूएच२६पी११०१११२).
देहूः वैकुंठस्थान येथील भाविकांसाठी उभारण्यात आलेले भक्तनिवास.(डीयूएच२६पी११०१११३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com