

ओढ गावाकडची...
शहरी भागात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, दूषित पाणी होत असल्याने शहरातील नागरिक खेडोपाड्यात जागा घेऊन राहत असल्याचे दिसून येत आहे. खेडेगावातील नागरिक शेतामध्ये काबाडकष्ट करतात. पौष्टिक आहार, वेळेवर झोप, वेळेवर उठतात. त्यातही खेड्यात ज्येष्ठ नागरिकांची अधिक असते. एकंदरीत खेडेगावातील जीवनशैली अतिशय साध्या पद्धतीने असल्याने तेथे आरोग्यही चांगले राहते आणि वयोमानही चांगले लाभते.
- उत्तम ठाकर, शिवणे
श हरामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट फिल्टर केली जाते. त्यामुळे मानवी जीवनात अत्यावश्यक असलेले घटक देखील या फिल्टरमधून निघून जातात. फिल्टरच्या नावाखाली त्यात अनेक केमिकल देखील मिसळले जातात. शहरी नागरिकांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. तसेच वाहनांच्या प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाणही शहरात अधिक आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात कामधंद्यासाठी गेलेला माणूस आठवड्यातून एक दिवस का होईना गावाकडील शुद्ध हवा, येथील जीवनशैली अनुभवण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे. अनेक जण शेतीवाडीही घेऊ लागले आहे. तेथे फार्म हाउस बांधून आठवड्यातून एक दिवस सुटीचा आनंद ग्रामीण भागात घेत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे गावोगावी चांगले बंगलो, घरे दिसू लागली आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात ॲग्रोटुरिझम बाळसे धरू लागले आहे. पवन मावळात तर त्याचे प्रमाण अधिक आहे. येथील वातावरण आणि निसर्ग संपदा यामुळे पर्यटक येथे आकर्षित होताना दिसतात. शहरातील नागरिकांना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली स्वच्छ हवा, पाणी, पौष्टिक जेवण हे खेडेगावातच उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जमिनीला आता सोन्याचा भाव आला आहे. कारण प्रत्येकजण सेकंड होम म्हणून फॉर्महाउसची निवड करीत आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि लागवडी योग्य जमिनींचा ऱ्हास होऊ लागला आहे. स्थानिक प्राणीशास्त्रीय आणि वनस्पतिजन्य प्रजाती नष्ट होण्याच्या स्थितीत किंवा त्याहूनही वाईट म्हणजे नामशेष आणि एकूणच जैवविविधतेचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरी आणि ग्रामीण वातावरण आणि वाढते नागरिकरण पाहता ग्रामीण भागात काही निर्बंध घालणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात ग्रामीण भागाचे शहर होण्यास वेळ लागणार नाही. येथील संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तसेच ग्रामीण जीवनशैली कायम ठेवण्यासाठी बांधकामामध्ये काही निर्बंध आणण्याची गरज आहे. बांधकामांमुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविणे काळाची गरज आहे.
शहरात कोणाला बोलायला वेळ नाही. जो तो आपापल्या व्यापात व्यग्र असलेला दिसतो. तुलनेने ग्रामीण भागात संस्कृती टिकून आहे. अजूनही माणुसकी खेड्यांमध्ये टिकून आहे. त्यामुळे सर्व गावात एकजूट असते. सर्व कार्यक्रम एकत्र केले जातात. आजही एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जातो. आजही गणेश विसर्जन आख्खा गाव एकत्र जाऊन करतो. ही एकी गावात अजून तरी पाहायला मिळते. त्यामुळे आगामी काळात शहरातील मंडळींनी ग्रामीण भागात जरूर यावे, येथील माणुसकी अनुभवावी, निसर्ग न्याहाळावा, खेड्यातील गावरान भोजनाचा आस्वाद घ्यावा. परंतु गावाचे शहरीकरण करू नये. ही गावे अधिक स्वच्छ कशी राहतील, यासाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.