

गुनाट, ता. १८ : करडे (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य आदिनाथ ओगले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र जगदाळे होते. या वेळी आजी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्यात आल्या. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास वाळके, उपसरपंच राजेंद्र गायकवाड, विद्यालयातील शिक्षकांतर्फे ४२ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच सुनील इसवे, माजी सरपंच लक्ष्मण वाळके, विशाल घायतडक, नीलेश पवार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.