अभिवादन दिनासाठी तब्बल ७४ एकराचे पार्किंग

अभिवादन दिनासाठी तब्बल ७४ एकराचे पार्किंग

Published on

शिक्रापूर, ता. ११ : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीमभक्त येतात. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी शिक्रापुरात १४ एकरांचे अतिरिक्त पार्किंग आणि सुमारे एक हजार अतिरिक्त पोलिस बळ वाढविले आहे. एकूण ७४ एकर क्षेत्र पार्किंगसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
१ जानेवारी २०२५ ला कोरेगाव भीमा शौर्यदिनानित्त विजयस्तंभ येथे शेकडो अनुयायी अभिवादनासाठी येतात. या निमित्ताने पोलिस अधीक्षक देशमुख यांनी नुकतीच शिक्रापूर पोलिस ठाण्यासह परिसराची, पार्किंग व्यवस्थेची, बंदोबस्तासाठी येणाऱ्या राज्यभरातील पोलिस पथकांच्या व्यवस्थेची प्राथमिक माहिती घेतला.
अनुयायांची संख्या पाहता मागील वर्षापेक्षा पार्किंग क्षेत्रात वाढ केली आहे. यावर्षी पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या वक्फ बोर्डाचे ४० एकर, त्याच शेजारी असलेल्या शिवशंभो देवस्थानचे १४ एकर आणि चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील जातेगाव खुर्द हद्दीतील २० एकर असे एकूण ७४ एकर क्षेत्र वाढविले आहे. दरम्यान यावर्षीच्या पोलिस बंदोबस्तासाठी मागील वर्षीपेक्षा १ हजारांचा अतिरिक्त पोलिस फोर्सही वाढविल्याची माहिती देण्यात आली. शिक्रापूर आणि परिसरातील पाहणीवेळी शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com