दुर्गा ब्रिगेडतर्फे वारकऱ्यांना मेट्रोची सफर

दुर्गा ब्रिगेडतर्फे वारकऱ्यांना मेट्रोची सफर

Published on

पिंपरी, ता. १ ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे मेट्रोची सफर घडविण्यात आली. मेट्रोतील प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी कीर्तनाचेही आयोजन केले होते. पायी वारी करताना अचानक मिळालेल्या मेट्रो प्रवासाच्या अनुभवाने वारकरी सुखावले. पिंपरी ते फुगेवाडीदरम्यानच्या प्रवासात दीडशे वारकरी सहभागी झाले होते. मेट्रो ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांनी मेट्रो स्टेशन येथे वारकऱ्यांचे स्वागत केले. विणेकरी, दिंडीप्रमुख, टाळकरी आणि मृदंगवादक यांचा पुष्पगुच्छ आणि हार घालून सन्मान केला. वारकरी फुगेवाडीपासून पुन्हा पालखी सोहळ्याबरोबर पुण्याकडे मार्गस्थ झाले. यावेळी मेट्रो स्टेशनमध्ये अनेक पारंपरिक खेळ खेळण्यात आले. महिलांनी वारकऱ्यांसमवेत फुगडी घातली. यावेळी दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्ष दुर्गा भोर व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.