आपटी येथील छाप्यात
१२२५ लिटर दारु जप्त

आपटी येथील छाप्यात १२२५ लिटर दारु जप्त

Published on

पुणे, ता ८ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने शिरूर तालुक्यातील आपटी गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात १ हजार २२५ लिटर गावठी दारुसह चारचाकी वाहन असा ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आपटी गावातील भामा नदीच्या कडेला पोल्ट्री फार्मजवळ कच्च्या रस्त्यावर टाटा कंपनीच्या टेम्पोची भरारी पथकाने तपासणी केली असता वाहनामध्ये ३५ लिटर क्षमतेच्या ३५ प्लॅस्टिक कॅनमध्ये १ हजार २२५ लिटर गावठी दारू आढळून आली. वाहनचालक भाऊसाहेब बबन भोसले यास ताब्यात घेऊन वाहनासह एकूण ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे व दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तत्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक पोटे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.