पोलिस मित्र संघटनेतर्फे
महिला अधिकाऱ्यांचा गौरव

पोलिस मित्र संघटनेतर्फे महिला अधिकाऱ्यांचा गौरव

खराडी, ता. १० ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलिस मित्र संघटना, पुणे शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने चंदननगर पोलिस ठाण्यामधील सर्व महिला अधिकारी व महिला अंमलदार यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी चंदननगर पोलिस ठाण्याच्या
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, गोपनीय विभागाचे लक्ष्मण नवघणे यांच्यासह
महिला पोलिस अंमलदार उपस्थित होत्या.

दरवर्षी पोलिस मित्र संघटनेच्या वतीने महिला पोलिसांचा सत्कार करण्यात येतो, त्यांच्या या उपक्रमातून महिलांप्रती आदर व्यक्त केला जात असल्याचे मनीषा पाटील यांनी या वेळी नमूद केले.
पोलिस मित्र संघटनेचे सचिव ललित लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष किरण खैरे, संपर्क प्रमुख अमित सातकर, प्रवीण गुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी निखिल गायकवाड, राजेश आबनावे, नीलेश वारे, योगेश केदार, सुहास सातव, संदीप इथापे, चेतन येवले, दत्तात्रेय कुंभार उपस्थित होते.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com