खेड्र-आळंदी मतदारसंघ

खेड्र-आळंदी मतदारसंघ
Published on: 

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ

अशी झाली लढत २०१९
विजयी उमेदवार : पक्ष : मिळालेली मते (मताधिक्य)
दिलीप मोहिते पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस : ९६,८६६ (३३२४२)

विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पारडे जड. पक्षाकडूनही उमेदवारीचे स्पष्ट संकेत. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडे असताना शिवसेनेकडूनही उमेदवारीची मागणी. बंडखोरी होण्याची शक्यता. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही उमेदवारीसाठी मोठी चुरस. मतदारसंघात तिरंगी अथवा बहुरंगी निवडणूक झाल्यास विद्यमान आमदार निवडून येतात, असा आजवरचा इतिहास. दुरंगी झाल्यास चुरशीची होते. महाविकास आघाडीच्या वतीने एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न. बंडखोरी टाळण्यासाठी कसरत करावी लागणार‌.

अशी आहे स्थिती
१. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्‍चित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन दौऱ्यांदरम्यान मोहितेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.
२. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेन सात जणांनी उमेदवारी मागितली. मात्र, सुधीर मुंगसे, अतुल देशमुख यांच्यात तिकिटासाठी स्पर्धा. अनपेक्षितपणे देवेंद्र बुट्टे पाटलांचे नावही पुढे येऊ शकते.
३. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही दावा. सात जणांनी उमेदवारी मागितली. मात्र, बाबाजी काळे, अमोल पवार यांच्यात स्पर्धा.
४. महायुतीत खेडची जागा राष्ट्रवादीकडे असतानाही यांचे शिवसेना जिल्हा संघटक अक्षय जाधव निवडणूक लढविणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. तसेच या गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर थेट महायुतीचे उमेदवार असलेल्या मोहितेंविरोधात बोलत आहेत. त्यामुळे महायुतीत बेबनाव. शिवसेनेचे विजयसिंह शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन संचालक फोडून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले.
५. भाजपचे अनेक नेते मोहिते यांच्याविरोधात. या पक्षाच्या क्रांती सोमवंशी मोहितेंच्या विरोधात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सभापती झाल्या.‌
६. प्रमुख पक्षाकडून तिकीट न मिळालेल्या एखादा उमेदवाराला मनसेकडून संधी मिळण्याची शक्यता.


निवडणुकीतील मुद्दे
आमदार मोहितेंना अनेकदा संधी, आता चेहरा बदलावा, अशी मागणी. तालुक्याला भरघोस निधी म्हणून आमदार मोहितेच पुन्हा हवेत, अशीही मागणी. तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गावर सतत वाहतूक कोंडी. एमआयडीसीत स्थानिकांना नोकऱ्या नाहीत. एमआयडीसी भागात वाढलेली गुंडगिरी. राजगुरुनगर, चाकण व आळंदी नगर परिषदेच्या परिसरात कचरा, पाणी, पार्किंग, सांडपाणी इत्यादी नागरी समस्या. शेतीचे प्रश्‍न, कांद्याचा प्रश्‍न. कळमोडीचे पाणी पूर्व भागातील गावांना मिळावे, अशी मागणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.