किसनराव बाणखेले स्मर्ती व्याख्यानमाला उद्यापासून

किसनराव बाणखेले स्मर्ती व्याख्यानमाला उद्यापासून

मंचर, ता.१२ : “मंचर (ता.आंबेगाव) येथे मंगळवार (ता.१४) ते सोमवार (ता.२०) या कालावधीत शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवाचे (२०२४) आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने लोकनेते माजी खासदार (स्व.) किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे,” अशी माहिती शिव स्मारक समितीचे (मंचर) कार्याध्यक्ष ॲड. बाळासाहेब लक्ष्मण बाणखेले यांनी दिली.

शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव समिती यांच्यावतीने शेठ अंबालाल बाबूभाई ट्रस्टच्या आवारात (लाला बँकेच्या मागे) व्याख्यानमालेचे दररोज संध्याकाळी सात वाजता आयोजन केले आहे. शाहीर मालुसकर आणि पार्टी यांचा मंगळवारी (ता.१४) सिंहगर्जना सह्याद्रीचा कार्यक्रम, बुधवारी (ता.१५) छत्रपती शिवराय ते शंभुराजे या विषयावर आकाश पाटील यांचे व्याख्यान, गुरुवार (ता.१६) अभिनेते पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत निवेदक श्रीकांत चौगुले घेणार आहेत. दरम्यान, व्याख्यानमालेचे हे ३८ वे वर्ष आहे.

‍युवकांनो उद्योजक व्हा या विषयावर शुक्रवारी (ता.१७) महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिनजी ईटकर यांचे व्याख्यान, शनिवारी (ता.१८) जीवन सुंदर आहे, आनंद मिळवा! या विषयावर गणेश शिंदे यांचे व्याख्यान, रविवारी (ता.१९) कुटुंब रंगले काव्यात या विषयावर साहित्यिक विसूभाऊ बापट यांचे व्याख्यान व सोमवारी (ता.२०) सज्जनहो समाजकार्यात पुढे या विषयावर भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद भोई यांचे व्याख्यान होणार आहे.

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सचिन गाडे, मेंदू रोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत गाडे, किडनी रोग तज्ज्ञ डॉ. प्रीतम गाडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनायक खेडकर, मोरडे फूड्स उद्योग समूहाचे हर्षल मोरडे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय थोरात, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री भैरवनाथ यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय थोरात, उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, कार्याध्यक्ष वसंतराव बाणखेले, आदी मान्यवरांनी केले आहे.

19325, 19326

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com