जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुलांची बाजी

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुलांची बाजी
Published on

पुणे, ता. २१ ः पुणे व पिंपरी-चिंचवड शहर वगळता जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागाचा बारावीचा निकाल ९४.१३ टक्के लागला आहे. या परीक्षेत ग्रामीण भागातील एकूण ५९ हजार ५९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३१ हजार ६८० मुले आणि २७ हजार ९११ मुलींचा समावेश आहे. यंदाच्या ग्रामीण भागातील मुलांनी बाजी मारली आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ५३.१७ टक्के मुले आणि ४६.८३ टक्के मुलींचा समावेश आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक ९८.५८ टक्के निकाल वेल्हे तालुक्याचा तर, सर्वात कमी ९१.३८ टक्के निकाल मावळ तालुक्याचा लागला आहे. या निकालात ग्रामीण भागातील ११० हुन अधिक कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (एचएससी. बोर्ड) फेब्रुवारी व मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.२१) जाहीर झाला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण ६३ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी प्रत्यक्षात ६३ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. उर्वरित ३९४ विद्यार्थी हे या परीक्षेला अनुपस्थित होते, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय निकाल (टक्केवारीत)

- शिरूर --- ९५.२६ टक्के
- पुरंदर --- ९४.६३
- दौंड --- ९४.१८
- जुन्नर --- ९३.९७
- इंदापूर --- ९६.५१
- मुळशी --- ९७.१४
- आंबेगाव --- ९५.४७
- बारामती --- ९६.३२
- भोर --- ९४.४३
- हवेली --- ९४.७८
- खेड --- ९२.०५
- मावळ --- ९१.३८
- वेल्हे --- ९८.५८

बारावी निकाल दृष्टीक्षेपात
- परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी --- ६३ हजार ६९८
- प्रत्यक्षात परीक्षेला बसलेले विद्यार्थी --- ६३ हजार ३०४
- उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी ---
५९ हजार ५९१
- परीक्षेला अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी --- ३९४
- उत्तीर्ण झालेल्या मुलांची संख्या --- ३१ हजार ६८०
- उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या --- २७ हजार ९११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com