ऊस उत्पादकता वाढीबाबत बारामतीत शनिवारी कार्यशाळा

ऊस उत्पादकता वाढीबाबत बारामतीत शनिवारी कार्यशाळा
Published on

पुणे, ता. ४ : ‘अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती’ व ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ (विस्मा) यांच्यावतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरघोस ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचा आधुनिकरणासाठी वापर’ या कार्यशाळेचे बारामती येथे शनिवारी (ता. १५) आयोजन केले आहे, अशी माहिती ‘विस्मा’कडून देण्यात आली.

ऊस पीक आणि साखर उद्योगाने महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल व आर्थिक सुबत्ता गेल्या पाच दशकामध्ये आणली आहे. चालू हंगाम २०२४-२५ मध्ये नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे देशातील प्रमुख ऊस उत्पादन राज्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक व गुजरात राज्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यशाळा भरविण्यात आली आहे.

उसापासून साखर, सहवीज, रसायने, इंधने इथेनॉल, बायो-सीएनजी व नावीन्यपूर्ण उत्पादने-मिथेन, हवाई इंधन, ग्रीन हायड्रोजन, बायोप्लॅस्टिक्स यामध्ये साखर कारखाने आघाडीवर आहेत. यासाठी पुरेसे, दर्जेदार ऊस उत्पादन आवश्यक आहे. चालू हंगामात उत्पादनाला फटका बसल्याने देशातील मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन ३१९ लाख टनांवरून २६५ लाख टनापर्यंत घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या आर्थिक बाबींवर फटका बसू शकतो. साखर उद्योगात ‘ऊस पिकाची’ अत्यंत मौलिकता आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे भरघोस उत्पादनाची किमया अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, मायक्रोसॉफ्ट कंपनी व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी गेल्या पाच वर्षांमधील संशोधनाने ऊस उत्पादनात मोठा बदल घडवला असल्याचे ‘विस्मा’कडून सांगण्यात आले.

विविध मान्यवर साधणार संवाद...
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यशाळेत ज्येष्ठ नेते शरद पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे या वेळी मनोगत व्यक्त करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com