‘आयडब्लूएमएस’मुळे पारदर्शक विकासकामे
पुणे, ता.१३ : पुणे जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या विकास कामांवर होणाऱ्या टीका टाळण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रियांसाठी ‘बुद्धिमान कार्य व्यवस्थापन प्रणाली’ (आयडब्लूएमएस) विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर सुरू केला असून, यामुळे कामांमध्ये अधिक पारदर्शकता येऊन कामांच्या दर्जामध्ये ही वाढ होत असल्याचा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. केवळ प्रणाली विकसित न करता प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेतील प्रत्येक अभिलेख हा डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत.
कामाच्या गुणवत्तेवरून होत असलेल्या टीकेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने आता ठेकेदार आणि प्रशासनासाठी नव्याने कार्यपद्धती निश्चित केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यामध्ये रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेवरून आमदारांनी जोरदार टीका केली होती.
दरम्यान, जिल्हा परिषदेची अगोदरची ऑनलाइन प्रणालीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या प्रणालीमध्ये प्रशासकीय मान्यतेपासून ठेकेदारांची बिले देण्याचा समावेश करण्यात आला आहे.
फाइल गहाळ होणे थांबणार
प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, निविदा मसुदा, कागदपत्रे, कार्यारंभ आदेश आणि देयके सर्व कामे या प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येकवेळी कामाची फाइल गहाळ होण्याचे ही प्रकार घडतात. ते या प्रणालीमुळे थांबणार आहेत. कारण प्रत्येक अभिलेख या प्रणालीवर नेहमी उपलब्ध असणार आहे. डिजिटल स्वरूपात प्रत्येक अभिलेख जतन केल्यामुळे तो आवश्यक असल्यास सहज उपलब्ध होणार आहे.
असा होणार प्रणालीचा उपयोग
१. निवृत्तिवेतनाच्या प्रस्तावांसाठी पेन्शन इलुस्ट्रेशन ही प्रणाली सुरू केली आहे.
२. जानेवारी महिन्यात या प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला.
३. त्यामध्ये आत्तापर्यंत २६ कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन आदेश मंजूर केले आहेत.
४. स्थानिक कार्यालयापासून ऑनलाइन पद्धतीनेच कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
५. निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनामध्ये अचूकता
६. प्रस्ताव मंजुरीचा वेग वाढला
प्रणालीच्या माध्यमातून केलेली कामे
प्रशासकीय मान्यता...........२,५८७
अंदाजपत्रके...........२,२५७
तांत्रिक मान्यता...........२,२५७
निविदा मसुदा कागदपत्रे...........२,२५७
कार्यारंभ आदेश...........४३१
देयके...........३,८०४
ऑनलाइन प्रणालींमुळे कामांमध्ये वेग आला आहे. शिवाय अचूकता अधिक दिसून येत आहे. निविदा प्रक्रियेतील प्रत्येक बाब आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने कारभार अधिक पारदर्शक राहणार आहे. याशिवाय निवृत्तीवेतनसाठी कार्यान्वित करण्यात आलेली प्रणालीही फायदेशीर ठरत आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
13821, 13820
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.