कडू- गोड आठवणींनी सरत्या वर्षाला निरोप
- १७ जानेवारी- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुणे- नाशिक महामार्गावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी मोटार, रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त एसटी बस व आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला होता. त्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील १८पैकी नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आठ जण जखमी झाले होते.
- १३ मे- खेड तालुक्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने भीमा नदीला पूर आला होता.
- ७ जुलै- पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गास विरोध करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.
- ५ ऑगस्ट- जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे आठ वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यू
- ११ ऑगस्ट- खेड तालुक्यातील पाईट गावाजवळील कुंडेश्वर देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भविकांच्या वाहनाला अपघात होऊन १२ महिला ठार, तर २९ भाविक जखमी झाले होते.
- १७ ऑगस्ट- शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाईनगर परिसरात बंटी ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर (ता. पारनेर) येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
- २० आॅगस्ट- इंदापूर तालुक्यात नीर नदीला पूर
- २२ ऑगस्ट- वेल्हे तालुक्याचे राजगड तालुका नामकरणाचा अध्यादेश निघाला.
- १ सप्टेंबर, २२ सप्टेंबर व २ ऑक्टोबर- शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू
- २८ सप्टेंबर- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणामधून पहाटे ३.३० वाजता अचानक पुष्पावती नदी पाणी सोडल्याने नदीवरील मोटारी आणि नदीलगतच्या शेतीचे व शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गोठ्यात पाणी शिरल्याने एक गाय जागीच ठार झाली आहे. उदापूर येथील पुष्पावती नदीवरील छोटा पुल अर्धा तुटून वाहून गेला होता.
- २१ डिसेंबर- नगरपालिका निवडणुकांचा निकाल
- २८ डिसेंबर- बारामतीत देशभरातील तालुका पातळीवरील पहिले विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

