पुणे
नगरपालिका
पुणे जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रभागनिहाय नगरसेवकपदासाठी प्रभागनिहाय आरक्षण बुधवारी (ता. ८) जाहीर झाले आहे. या आरक्षणानंतर काही इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाण्यात फिरले तर काही इच्छुक आनंदी झाले आहेत. महिलांसाठी राखीव जागा ठरल्यामुळे महिला उमेदवारांचा दबदबा वाढणार असल्याने आपल्या सौभाग्यवतींना राजकीय आखाड्यात उतरविण्यासाठी अनेकांनी तयारी केली असून राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जाहीर झालेल्या प्रभागनिहाय आरक्षणाने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे गडद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय आखाडा तापण्यास सुरुवात होणार आहे.