विक्रमादित्य, मिहिराला दुहेरी सुवर्ण

विक्रमादित्य, मिहिराला दुहेरी सुवर्ण

Published on

पुणे, ता. २२ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मल्लखांब स्पर्धेमध्ये ८ ते १० वर्षे मुलांच्या गटात एरंडवणे येथील डॉ.कलमाडी शामराव हायस्कूलच्या विक्रमादित्य सोनाळे याने तर मुलींमध्ये एरंडवणेमधील सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मिहिरा कर्वे यांनी दुहेरी सुवर्णपदके पटकाविली.
टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. आशियाई मल्लखांब महासंघाचे सचिव अभिजीत भोसले, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरे, कार्याध्यक्ष दिलीप भिकुले, सचिव राज तांबोळी, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ऋषिकेश अरणकल्ले, महाराष्ट्रीय मंडळाचे कार्यवाह रोहन दामले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शुभंकर खवले, पुणे महापालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीपाद जगताप, जिल्हा संघटनेचे सदस्य सचिन लखासे, नीलेश धावडे, संगमेश्वर खुरपे, समीर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. लीना पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले.

निकाल
८ ते १० वर्षे मुले ः पोल आणि दोरी - विक्रमादित्य सोनाळे (डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल, एरंडवणे), वरद गायकवाड (आर्मी पब्लिक स्कूल, खडकी), राज लखासे (एस.पी.एम पब्लिक स्कूल, सदाशिव पेठ).
मुली ः दोरी - मिहिरा कर्वे (सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे), ओवी कुडपणे (अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव), स्वराली विचारे (एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, येरवडा)
पोल - मिहिरा कर्वे (सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे), ओवी कुडपणे (अभिनव एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव), ईशा भोसले (डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल, एरंडवणे).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com