अक्षरनंदन, ब्लॉसम, नॉव्हेलची घोडदौड

अक्षरनंदन, ब्लॉसम, नॉव्हेलची घोडदौड

Published on

पुणे, ता.२२ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेनापती बापट रस्त्यावरील अक्षरनंदन स्कूल, नऱ्हेचे ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विजयी घोडदौड चालू ठेवली.
मुंढवा येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात ‘अक्षरनंदन’ने कात्रजच्या फ्लायिंग बर्डस् संघाला ११ धावांनी हरविले. यष्टिरक्षक फलंदाज रायन पानसक याने २८ चेंडूंत सुरेख ४० धावा फटकावल्या. त्यालाच सामनावीराचा बहुमान मिळाला.
दुसऱ्या सामन्यात ‘ब्लॉसम पब्लिक’ने शिवणे येथील वॉलनट स्कूलवर १० धावांनी विजय मिळविला. सलामीवीर अविष्कार पलंगे सामन्याचा मानकरी ठरला. त्याने २८ चेंडूंत नाबाद ४२ धावा केल्या. प्रतिस्पर्धी वॉलनटचा कर्णधार अर्णव खिलारी यानेही ३८ चेंडूंत नाबाद अर्धशतक काढले. परंतु, सहकारी फलंदाज लवकर बाद झाल्याने संघाचा विजय दुरावला.
अखेरच्या सामन्यात नॉव्हेल इंटरनॅशनलने आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ३५ धावांनी पराभव केला. सलामीवीर
अवनीश यादव याला सामनावीराचा बहुमान मिळाला.


संक्षिप्त धावफलक
अक्षरनंदन ः १० षटकांत ४ बाद ८८ (रायन पानसरकर ४०, धवल सावरकर १५, दिक्षीत मुदावत १-२३, श्रीराज जाधव १-२७) वि.वि. फ्लायिंग बर्डस् ः १० षटकांत ३ बाद ७७ (शौर्य वाघमारे नाबाद २०, साईराम नानावट २०, श्लोक काळे २-१२, कबीर जाधव १-५).
ब्लॉसम पब्लिक ः १०० षटकांत ३ बाद १०० (अविष्कार पलंगे ४२, संस्कार टोगे २३, कौस्तुभ जांभळे १७, अर्णव खिलारी २-१६, गौरीश पोखर्णा १-१८) वि.वि. वॉलनट ः १० षटकांत ६ बाद ९० (अर्णव खिलारी नाबाद ५२, ओम गायकवाड २-७, कौस्तुभ जांभळे १-१५).
नॉव्हेल इंटरनॅशनल ः १० षटकांत २ बाद ९९ (अवनीश यादव ४७, आदित्य नाईक नाबाद १६, पार्थ अरोरा १-१६) वि.वि. पोदार इंटरनॅशनल ः १० षटकांत ४ बाद ६४ (यशराज मेदनकर १३, आरुष कुंजीर २-८, पार्थ वरभे १-१०, नक्ष नाईक १-८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com